esakal | कॉलेज सकाळी तर शाळा दुपारी ! जिल्ह्यात उद्यापासून 345 शाळा उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

School

कॉलेज सकाळी तर शाळा दुपारी! जिल्ह्यात उद्यापासून 345 शाळा उघडणार

sakal_logo
By
तात्या लांडगे

जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या 637 गावांमधील 345 शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत.

सोलापूर : कोरोनामुक्‍त (Covid-19) गावांमध्ये (महिनाभर रुग्ण न आढळलेली गावे) आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या 637 गावांमधील 345 शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत अकरावी-बारावीचे वर्ग तर, साडेअकरा ते साडेचार या वेळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. (Colleges in the Solapur district will start in the morning and schools in the afternoon from tomorrow-ssd73)

हेही वाचा: "कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळण्यासाठी काढावा लागेल मोर्चा!'

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता असून त्यात बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेताना शिक्षणमंत्र्यांनी स्वत:च्या विभागाकडे काहीच अधिकार ठेवले नाहीत. शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती, ग्रामसभेचा ठराव बंधनकारक केला आहे. परंतु, पालकांच्या संमतीविनाच सर्वसामान्यांची मुले शाळेत येत असल्याचे चित्र आहे. राज्यातील जवळपास सात लाख पालकांचा अभिप्राय घेण्यात आला असून त्यात 86 टक्‍के पालकांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यात विशेषत: मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur), कोल्हापूर (Kolhapur) या विभागातील सर्वाधिक पालक आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी कोरोनाचे नियम पालन करणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swamy, Chief Executive Officer of Solapur Zilla Parishad) हे विविध शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

हेही वाचा: पंढरपूर पं.स.चे बीडीओ कार्यमुक्त! जि.प.चे सीईओ स्वामी यांचे आदेश

दोन डोस घेतलेल्या शिक्षकांनाच ड्यूटी

कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांनाच आठवी ते बारावीच्या वर्गावर अध्यापन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तत्पूर्वी, त्या शिक्षकांनी संबंधित गावातच राहावे, अशी अट घातली आहे. परंतु, त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. ज्या गावात मागील 30 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, अशाच गावात शाळा सुरू केल्या जात आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या गावात कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्यास त्याच दिवशी त्याठिकाणची शाळा बंद करावी, अशी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिली आहे.

सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये आठवीचे वर्ग आहेत, अशा 135 पैकी 83 शाळा ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. एक हजार 122 पैकी 605 मुले शाळेत हजेरी लावत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली. तर महिन्यापासून रुग्ण न सापडलेल्या 637 गावांमधील 345 शाळा गुरुवारपासून दोन सत्रात सुरू होतील, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी दिली. या शाळांमध्ये जवळपास तीन लाख 10 हजार मुले असून वर्गखोल्या व शिक्षकांची उपलब्धता पाहून मुख्याध्यापकांनी मुलांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

loading image