esakal | "कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळण्यासाठी काढावा लागेल मोर्चा!'
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Kranti Morcha

"कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळण्यासाठी काढावा लागेल मोर्चा!'

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

कोपर्डीच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ त्या कन्येला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

सोलापूर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली असून, अद्यापही त्या निष्पाप कन्येला न्याय मिळाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यात आली होती, मात्र जर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या केसच्या निकालाला पाच वर्षे लागत असतील तर मग जनरल केसचे निकाल काय असतील? आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून 58 मोर्चे काढण्यात आले, मात्र यापुढे कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढावा लागेल, असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव (Anant Jadhav) यांनी दिला आहे. कोपर्डीच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ त्या कन्येला मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याप्रसंगी अनंत जाधव बोलत होते. कोपर्डी घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या घराघरात उमटले होते. एक वर्षभर हे प्रकरण ठिकठिकाणी चर्चिले जात होते. मात्र सर्वांनाच सध्या या घटनेचा विसर पडला आहे की काय? असा सवालही माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे. (Tribute paid to Kopardi's unjust daughter by Maratha Kranti Morcha ssd73)

हेही वाचा: पंढरपूर पं.स.चे बीडीओ कार्यमुक्त! जि.प.चे सीईओ स्वामी यांचे आदेश

कोपर्डीच्या कन्येमुळे संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला. आज पाच वर्षे पूर्ण झाली तरी सुद्धा त्या निष्पाप ताईला न्याय मिळाला नाही. ते नराधम आजही जिवंत आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या नराधमांना फासावर लटकवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लढा चालूच ठेवणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी व्यक्त घेतली आहे..

कोपर्डीतील घटनेला पाच वर्षे लोटूनही जर त्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर न्यायालयावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे कायद्यावरील विश्वास आणि महाराजांच्या महाराष्ट्रात अशी कृती करणाऱ्या नराधमांना तत्काळ फासावर लटकवावे; अन्यथा यापुढे गनिमीकाव्याने आंदोलन करावे लागेल, अशी संतप्त भावना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

हेही वाचा: आता श्री विठ्ठलाचे चोवीस तास ऑनलाइन दर्शन !

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत (District President of Sambhaji Brigade Somnath Raut) म्हणाले, जोपर्यंत कोपर्डीच्या ताईला न्याय मिळणार नाही तोवर आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. त्याचबरोबर राज्यात कोणत्याही समाजाच्या आई-बहिणींसोबत असे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड कायम रस्त्यावरची लढाई लढणार आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी राज सरडे, बजरंग जगदाळे, रमेश हावळे, योगेश बंडगर, सौदागर चव्हाण, उमाकांत कारंडे, श्रीकांत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image