सोलापूर : राज्यातील अकृषिक विद्यापीठांसह अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांबरोबरच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसल्याने जागेची उपलब्धता पाहून 50 टक्के विद्यार्थ्यांना रोटेशन पध्दतीने बोलावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिल्या आहेत. तर वसतिगृहात प्रवेश देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य द्यावे आणि एका खोलीत एकच विद्यार्थी असावा, अशाही सूचना केल्या आहेत.
महाविद्यालयांसाठी नियमावली...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, अंतर्गत चाचण्या व अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अथवा आवारात फिरताना मास्क वापरणे बंधनकारक असेल. महाविद्यालयांमधील कॅन्टिनवर देखरेख ठेवावी, विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी देण्यापूर्वी वसतिगृहाचे विद्युत लेखापरीक्षण करुन घेतले जाणार आहे. खोलीतील विद्युत साहित्य तपासून घेतले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांची माहिती संकलित करुन त्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन वर्गात शिकविता येईल, अशी मुभा देण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.