मोहोळ : उत्पादन येत नाही या विवंचनेतुन तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गायकवाड वस्ती येथे घडली
committed Suicide young farmer
committed Suicide young farmer sakal

मोहोळ : शेतात खर्च करूनही उत्पन्न मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ येथील गायकवाड वस्ती येथे ता 29 रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. मनोज राजाराम गायकवाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत मनोज हा मोहोळ येथील गायकवाड वस्ती वर त्याच्या आज्जी आजोबा सोबत राहत होता. त्याने त्याचे शेतात बराच खर्च केला होता. मात्र त्याला खर्चा एवढेही उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे तो कायम तणावात असायचा. याच विवंचनेतून मनोज याने मंगळवार ता 29 रोजी दुपारी लिंबाच्या झाडाला गळ्यातील पंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर राजाराम पांडुरंग गायकवाड वय 65 रा नरखेड रोड गायकवाड वस्ती यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार गणेश पोफळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com