

Barshi Bus Stand Chaos: Conductor Attacked, ₹3,000 Reported Stolen
Sakal
बार्शी : बार्शी-नारायणगाव बस बार्शी स्थानकावर येताच लांबचे प्रवासी अगोदर बसा, कुर्डुवाडीचे नंतर बसा असे वाहकाने म्हणताच कुर्डुवाडीचे प्रवासी पैसे देत नाहीत का? असे म्हणत दोघांनी वाहकाची गच्ची पकडून मारहाण केली. धक्काबुक्कीमध्ये तीन हजार रुपये गायब झाले, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.