

मंगळवेढा - शासनाकडून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमातून आले. त्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्याचा समावेश नव्याने मानदेश नावाच्या जिल्ह्यात होणार असल्याचे छायाचित्रासह सोशल मीडियातून फिरू लागल्याने तालुक्यातील नागरिकांतून नवीन जिल्ह्यात होणाऱ्या समावेश याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण येत नसल्याने नागरिकांची संभ्रावस्था वाढत आहे.