
Congress workers performing pinddaan protest in front of Mangalevedha municipal office against waterlogging issues.
Sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : गेले तीन दिवस पडलेल्या सतत दमदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर पाणी साचले आहे. त्या पाण्याचा निचरा करण्यास नगरपालिका प्रशासन अकार्यक्षम ठरल्यामुळे नगरपालिकेसमोर साचलेल्या पाण्यातच शहर काँग्रेसच्या वतीने पिंडदान करत पालिका प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयातील खुर्चीला हार घालत शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी न देणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.