

Political Equations in Solapur Shift — Congress Eyes NCP, CPM for New Front
Sakal
सोलापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसला वगळून आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर काँग्रेसकडूनही तिखट प्रतिक्रिया आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या स्थानिक परिस्थिती पाहून लढवल्या जातात. ते ७२ जागा मागत असतील उर्वरित जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व माकप यांच्यात समान जागा वाटप कसे होईल असा प्रश्न आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या बैठका होतील, त्यानंतर जागा वाटप व इतर विषयांवर अंतिम निर्णय होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.