esakal | सोलापुरातील तुरुंगात घूसला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona broke into the Solapur jail

सोलापुरात कोरोनाचा कहर होत असून गुरुवारी (ता. 28) 81 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी (ता. 29) सकाळच्या सत्रात 74 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून त्यानंतर आता रात्रीच्या अहवालाकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सोलापुरातील तुरुंगात घूसला कोरोना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्याला निमोनिया झाल्याने तो 22 मेपासून केगाव येथील विलगीकरण कक्षात दाखल झाला होता. तुरुंग अधीक्षकांच्या पत्रानंतर त्याला कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. 26 मे रोजी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आता नव्याने सात पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. या पार्श्‍वभूमीवर तुरुंगातील सर्वच कैद्यांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती तुरुंग अधीक्षक दिगंबर इगवे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

सोलापुरात कोरोनाचा कहर होत असून गुरुवारी (ता. 28) 81 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी (ता. 29) सकाळच्या सत्रात 74 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून त्यानंतर आता रात्रीच्या अहवालाकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा कारागृहातील त्या सात पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा नेमकी कुठून आणि कोणाच्या संपर्कातून झाली याचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा तुरुंगातील कैद्यांशी नियमित संपर्क आल्याने कैद्यांच्या अहवालाकडेही लक्ष लागले आहे. 

'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचा कैद्यांशी नियमित संपर्क 

तुरुंगातील एजन्सी देखरेख व त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी नियुक्त असलेल्या त्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. या पार्श्वभूमीवर त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व तुरुंगातील सर्व कैद्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आम्ही दोघे अधिकारी निगेटिव्ह आलो असलो तरीही तुरुंगात कोरोना पोहोचल्याची खंत आहे. 
- दिगंबर इगवे, तुरुंग अधीक्षक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह 

'त्या' वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चालकासह तिघांना कोरोनाची लागण 

सोलापूर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चालकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांचा स्टेनो आणि घराबाहेरील दोन पोलीस कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील काही व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या अहवालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  

loading image
go to top