esakal | कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना दोन महिन्यांची सुट्टी !
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना आता दोन महिन्यांची सुट्टी !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, कोरोना नियंत्रण कक्षातील ड्यूटी आणि कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगची जबाबदारी दिली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने आता माध्यमिक शिक्षकांचीही मदत त्यासाठी घेतली जाणार आहे. दरम्यान, कोरोनाची ड्यूटी करताना पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना दोन महिन्यांची सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या असून अंदाजित 32 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेतल्या जाणार आहेत. मात्र, त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. त्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित केले जाणार असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येणार नाहीत, याचीदेखील खबरदारी घेतली जाईल, असे पुणे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोरोनाला रोखण्यासंदर्भात दिलेली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने आता माध्यमिक शिक्षकांनाही सर्व्हेची जबाबदारी दिली जाणार आहे. घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील 45 वर्षांवरील किती सदस्यांनी लस टोचून घेतली आहे. लक्षणे असतानाही किती सदस्यांनी कोरोना टेस्ट केलेली नाही, कुटुंबातील को-मॉर्बिड तथा ज्येष्ठ नागरिकांची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान किती आहे, याची नोंद शिक्षकांना सर्व्हे करताना घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू ! आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली उभारतंय शंभर बेडचे हॉस्पिटल

शिक्षकांसाठी असावी स्वतंत्र बेडची व्यवस्था

मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक, नागपूर, जळगाव, औरंगाबाद यासह बहुतेक जिल्ह्यांमध्ये रूग्णसंख्या वाढतच आहे. दुसरीकडे मृत्यूदरही वाढत असल्याची चिंता आहे. या पार्श्‍वभूमीवर रूग्णसंख्येबरोबरच मृत्यूदर आटोक्‍यात यावा, या हेतूने शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्व्हे करावा लागत आहे. शिक्षकांना कोरोना ड्यूटी करताना विषाणूची बाधा होऊन त्यात मृत्यू झाल्यास 50 लाखांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी काही शिक्षक संघटनानी करूनही त्यावर निर्णय झालेला नाही. कोरोनाची ड्यूटी करताना किमान कोरोना बाधित शिक्षकांना रूग्णालयांमधील काही बेड राखीव ठेवावेत, अशीही मागणी शिक्षकांसह संघटनांनी केली आहे.

हेही वाचा: नऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून ! शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...

कोरोनातून बरे होईपर्यंत शिक्षकांना सुट्टी

कोरोनाची ड्यूटी करताना बाधित झालेल्या शिक्षकांना बरे होईपर्यंत दोन महिन्यांची सुट्टी दिली जाईल. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ड्यूटी करणारे शिक्षक बाधित झाल्यास त्यांच्यासाठी खासगी व शासकीय रूग्णालयांत राखीव खाटा ठेवण्यासंदर्भात महापालिका आयुक्‍त लवकरच निर्णय घेतील. मागील काही दिवसांत शहरातील आठ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

- कादर शेख, प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका

loading image
go to top