esakal | कोरोना : सोलापुरातील भुसार मार्केटचे ठरले वेळापत्रक 
sakal

बोलून बातमी शोधा

apmc solapur

सोलापूरकरांचे वाढले टेन्शन 
सोलापुरातील 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाजार समितीमधील भुसार मार्केट, सोलापूर बाजार समिती येथील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी केल्या गेल्या आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्याचा एक नातेवाईक व खासगी रुग्णालयातील एक महिला कोरोना बाधित झाली आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 12 झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू (किराणा दुकानदार) झाला आहे. तर उर्वरित 11 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोरोना : सोलापुरातील भुसार मार्केटचे ठरले वेळापत्रक 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. सोलापूर बाजार समितीमधील भुसार, आडत व्यापारी संघ, बाजार समिती व सहकार विभागाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची नुकतीच एकत्रित बैठक झाली आहे. या बैठकीत भुसार मार्केटसाठी वेळापत्रक निश्‍चित करून देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार आता कामकाज होणार आहे. व्यवहारासाठी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

हेही वाचा - लॉकडाऊन "यांच्या'साठी संकट नव्हे सुवर्णसंधी 

आज (गुरुवार) व उद्या (शुक्रवार) मालविक्री आणि डिलिव्हरीचे कामकाज केले जाणार आहे. शनिवारी (ता. 18) मालाचे फक्त अनलोडिंग केले जाणार आहे. सोमवारपासून (ता. 20) सोमवार, बुधवार आणि शुक्रवार काटा देणे, विक्री करणे आदी व्यवहार केले जाणार असून या दिवशी कोणत्याही मालाचे अनलोडिंग होणार नाही. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आलेल्या मालाचे फक्त अनलोडिंग करण्यात येणार असून या दिवशी मालाची विक्री आणि लोडिंग होणार नाही. बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. 

हेही वाचा - मोठी ब्रेकिंग! राज्याची पावणेतीन लाख कोटींची उलाढाल ठप्प 

या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभूते, उपाध्यक्ष सुरेश चिक्कळी, सचिव मोहन कोंकाटी आणि बाजार समितीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सर्व व्यापाऱ्यांनी मालाचे विक्री करताना ग्राहकांचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर बिलावर लिहावा, अनलोडिंग साठी आलेल्या मालाचे लोडिंग स्थळ आणि संबंधित ड्रायव्हर आणि क्‍लीनर चे नांव आणि मोबाईल नंबर चे नोंद आपल्याकडे ठेवावी, सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि स्वच्छतेचे नियम (सॅनिटायझर, हात धुणे वगैरे) पाळावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

loading image