कोरोना लसीकरणासाठी १६ लाख जण पात्र; पुढाकार महत्त्वाचा

Corona Vaccination
Corona VaccinationCorona Vaccine
Updated on

सोलापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना लसीसाठी एकूण 34 लाख 14 हजार जण पात्र आहेत. त्यापैकी 20 लाख 13 हजार जणांना पहिला डोस दिला आहे. पहिला डोस घेण्यासाठी अद्यापही 14 लाख व्यक्ती पात्र आहेत. जिल्ह्यातील सहा लाख 13 हजार जणांना दुसरा कोरोना लसीचा डोस दिला आहे. दुसरा डोस घेण्यासाठी 1 लाख 20 हजार जण अद्यापही पात्र आहेत. कोरोनाचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी जिल्ह्यात 16 लाख 20 हजार जण पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

कोरोनामुक्तीच्या लढ्यात कोरोना लसीकरणाशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या महामारीतून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता जोपासण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जणांचे वेळेत कोरोना लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

Corona Vaccination
पीसीबीने सुधारली ना‘पाक’ कृती; अखेर जर्सीवर टाकले भारताचे नाव

कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. कोरोना लसीकरणामध्ये जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांना सहभागी करून घेण्यात आहे. त्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रतिदिन सहा ते सात हजारांनी वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीचा सध्या मुबलक साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31 लाख 65 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांमधून दोन लाख 9 हजार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक लोकांची आतापर्यंत कोरोना चाचणी झाली असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Barber Services Become Costlier in Solapur from July 1; New Rates Announced
6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
Marathi News Esakal
www.esakal.com