
सोलापूर : क्रिप्टो करन्सीतून कमिशन मिळते म्हणून चुलत भावाने व्यावसायिक भावाचे करंट अकाउंटचे डिटेल्स घेतले. चुलत भावावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने त्यांचे काही वर्षांपूर्वी उघडलेल्या करंट अकाउंटची माहिती दिली. सायबर गुन्हेगारांनी त्या खात्याचा वापर दुसऱ्या लोकांची फसवणूक केलेली रक्कम ठेवण्यासाठी केला. दोन महिन्यात त्या खात्यात एक कोटी ८२ लाख ९८ हजार ७३८ रुपये जमा करून घेतल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी उमंग भरतभाई दढाणीया (रा. जुळे सोलापूर) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.