उपचारादरम्यान कोरोना रुग्णाची आर्थिक लूट ! मिरज येथील हॉस्पिटलवर गुन्हा

उपचारादरम्यान कोरोना रुग्णाची आर्थिक लूट ! मिरज येथील हॉस्पिटलवर गुन्हा
उपचारादरम्यान कोरोना रुग्णाची आर्थिक लूट ! मिरज येथील हॉस्पिटलवर गुन्हा
उपचारादरम्यान कोरोना रुग्णाची आर्थिक लूट ! मिरज येथील हॉस्पिटलवर गुन्हा
Updated on
Summary

तालुक्‍यातील अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना याच रुग्णालयात उपचार करताना आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना (Covid-19) संकटाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तालुक्‍यातील अनेक रुग्णांना बसला आहे. अशातच मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यातील हुन्नूर येथील रुग्णावर मिरज येथील ऍपेक्‍स हॉस्पिटलमध्ये उपचार करताना दुर्लक्ष करत 24 तासात एक लाख 40 हजार इतके बिल आकारल्याची तक्रार मृताच्या नातेवाइकांनी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणात तालुक्‍यातील अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना याच रुग्णालयात उपचार करताना आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उपचारादरम्यान कोरोना रुग्णाची आर्थिक लूट ! मिरज येथील हॉस्पिटलवर गुन्हा
सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

गुरुदेव महादेव कोरे (रा. हुन्नूर) यांनी वडील महादेव आमगोंडा कोरे यांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्यानंतर सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, त्यांना अधिक त्रास झाल्यामुळे पुढील उपचारासाठी मिरज येथील ऍपेक्‍स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरे यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून 24 तासांत कोणते उपचार केले, याची माहिती व्यवस्थापनाने नातेवाइकांना दिली नाही आणि उलट त्यांच्या वडिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांना प्रकृतीबाबतही कोणती माहिती दिली नाही. कोरे यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून 24 तासात त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान भरलेल्या बिलाची पावती मागितली असता, तुम्हाला पावती हवी की रुग्णावर उपचार, असा सवाल येथील डॉक्‍टरांकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र रुग्णाचा मृत्यू झाला. या 24 तासांत रुग्णालयाने बिल मात्र एक लाख 40 हजार रुपये भरून घेतले. परंतु, उपचारादरम्यान कोणते उपचार केले व बिलाच्या पावत्या देण्यास टाळाटाळ करत त्यांची फसवणूक करण्यात आली. या रुग्णालयात कोरोना काळात 87 रुग्णांवर उपचारादरम्यान हयगय केल्याच्या आरोपावरून डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

उपचारादरम्यान कोरोना रुग्णाची आर्थिक लूट ! मिरज येथील हॉस्पिटलवर गुन्हा
शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकी

मंगळवेढ्यातील अनेक रुग्णांची लूट

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवेढ्यातील अनेक रुग्णांना कोरोना उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, सांगली, जयसिंगपूर, इस्लामपूर या तालुक्‍यातील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला. परंतु येथील अनेक डॉक्‍टरांनी तालुक्‍यातील रुग्णांच्या नातेवाइकांकडून हात साफ करून घेतले. हुन्नूरबरोबरच भाळवणी, नंदेश्वर, हिवरगाव, खुपसंगी, भोसे येथील रुग्णांची देखील आर्थिक लूट केली असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River
POCSO Case
solapur
dogs
Marathi News Esakal
www.esakal.com