सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेधCanva
Updated on
Summary

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलंच भोवलंय. सोलापुरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना चांगलंच भोवलंय. सोलापुरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारण्यात आले. "आवाज कोणाचा, शिवसेनेचा', "कोंबडीचोर नारायण राणे हाय हाय...'च्या घोषणा देत शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांचा निषेध केला.

सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !

या वेळी शिवसेना नेते प्रताप चव्हाण म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली नारायण राणे यांनी कोकणामधील सभेमध्ये शिवसेनेचे पक्षनेते, राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. नारायण राणे यांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरू आहे. सोलापूर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा

प्रताप चव्हाण पुढे म्हणाले, ज्या नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं, परंतु नारायण राणे यांनी शिवसेना पक्षात राहून पक्ष गिळण्याचा प्रयत्न केला. गद्दारी केली. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षात रमून झाल्यावर आता राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने राणे यांना मंत्रिपद यासाठी दिलंय की, केंद्रामध्ये बाप भुंकायचा व राज्यामध्ये पोरं भुंकायचे, त्यामुळे नया मुल्ला ज्यादा अल्ला अल्ला करत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कितीही भुंकण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील शिवसैनिक सज्ज आहेत व नारायण राणे यांचा हात उखडून टाकतील. सोलापुरातील कार्यकर्ते व पदाधिकारी नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे संतापलेले आहेत. सोलापुरात नारायण राणे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करणार आहे व पोलिसांच्या माध्यमातून राणे यांना फरफटत आणणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River
POCSO Case
solapur
dogs
Marathi News Esakal
www.esakal.com