
Solapur Police shine with 80% crime detection success; ‘No DJ No Dolby’ initiative wins public praise.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : सर्वसामान्यावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, पोलीस दल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सोलापूरच्या पोलीस दलाचे काम उत्कृष्ट असून, त्यांनी काही गुन्ह्यात कर्नाटक पोलिसांना ही मदत केली आहे. ध्वनी प्रदूषणाचे खटले जिल्ह्यात सर्वात कमी आहेत. सोलापूर पोलीस दलाने 80 टक्के गुन्ह्याची उकल केली आहे. नो डीजे नो डॉल्बी हा सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राबविलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.