'सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या'

तुला मूलबाळ होत नाही, माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी पैसे आण.
Crime
CrimeSakal
Summary

तुला मूलबाळ होत नाही, माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी पैसे आण.

मोहोळ - तुला मूलबाळ होत नाही, माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी पैसे आण. या पती, दिर, व सासु यांच्या जाचाला कंटाळून एका 30 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना, गुरुवार ता. 9 रोजी रात्री पावणे नऊ वाजता कोन्हेरी ता मोहोळ येथे घडली. अनिता ब्रह्मदेव घाटुळे रा कोन्हेरी असे मृत विवाहितेचे नाव आहे. ब्रह्मदेव पांडुरंग घाटुळे (पती) शिवाजी पांडुरंग घाटोळे (दिर) व सुमन पांडुरंग घाटुळे (सासू) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.दरम्यान या प्रकरणी पती व सासुला अटक करण्यात आली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोरवंची ता मोहोळ येथील अनिता हिचा विवाह कोन्हेरी येथील ब्रह्मदेव घाटुळे याच्या बरोबर सन 2008 साली झाला आहे. विवाहानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी अनिताला चांगले नांदविले, मात्र थोड्या दिवसातच पती ब्रह्मदेव घाटुळे, दिर शिवाजी घाटुळे व सासू सुमन घाटुळे यांनी अनिताला तुला मूलबाळ होत नाही, तुझ्या माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी पैसे आण म्हणून तगादा लावणे सुरू करून तिला जाच हाट करू लागले. ही घटना अनिताने माहेरच्या मंडळींना सांगितली. माहेरच्या मंडळीनी गावातील काही प्रतिष्ठिता मार्फत समजावून सांगून हे भांडण मिटविले. तरीही अनिताला त्रास देणे सुरूच होते व अनिता ही तो त्रास सहन करीतच नांदत होती. अखेर त्रास असह्य झाल्याने अनिताने पती, दीर व सासू यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद सागर शंकर फाटे रा मोरवंची ता मोहोळ याने मोहोळ पोलिसात दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com