
Revenue officials to visit Solapur farmlands after Diwali for crop damage and soil erosion assessment.
Sakal
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने नदीकाठच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेल्याने, हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याचे जाहीर केले आहे. ही मदत देण्यासाठी दिवाळीनंतर महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू केले जाणार आहेत. या पंचनाम्यांसाठी महसूलची यंत्रणा बाधित शेतांची पाहणी करणार आहे.