
सोलापूर: ग्रामीण भागात उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे अनेक गावांना कॅनॉलचे पाणी शेती व जनावरांकरिता मिळालेले नाही. यामुळे मोहोळ तालुक्यातील वटवटे, जामगाव येथील नागरिक उपोषणाकरिता बसलेले होते. उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा अन् पीकविम्याचे १०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा, अशा सूचना खा. प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.