
"Rain-hit fields await survey: Hectare limit rule halts panchanamas in most Maharashtra districts."
Sakal
सोलापूर: राज्यातील २९ जिल्ह्यांमधील तब्बल ४७ लाख हेक्टरवरील पिके वाया गेल्याचा नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने शासनाला दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल म्हणून युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. मात्र, मंगळवारी राज्य सरकारने मदतीसाठी बाधित क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत केल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी संभ्रमात सापडले असून हेक्टरची मर्यादा वाढविल्यास पुन्हा पंचनामे करावे लागतील म्हणून सध्या पंचनामे थांबविण्यात आले आहेत.