
चिखलठाण: देशप्रेमाने भारलेली गीते, सामाजिक व्यंगावर आसूड ओढणारे एकनाथ महाराजांचे भारूड, राजकारणातील संगीत खुर्चीवर तिखट मारा करणारी वास्तव कविता, बासरीचे सुमधुर स्वर, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीतून मारलेली उत्साह वाढवणारी सफर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी केलेली शैलीदार, अभ्यासपूर्ण भाषणं, यांनी उजनी जलाशयाच्या ढोकरी येथील काठावर सृजनांची मैफील तुफान रंगली. साथीला बंडगर वस्ती येथील उजनी जलाशयाचा शांत, विस्तीर्ण परिसर, निमित्त होते स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सृजनांच्या स्नेह मेळाव्याचे.