
Current and ex-sarpanch of Kanhipur stage pothole sit-in protest over year-long road delay.
Sakal
पंढरपूर: मागील एक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करावे यामागणीसाठी कान्हापुरीतील (ता.पंढरपूर) येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी (ता.29) रस्त्यावर पडलेल्या खड्डयातील पाण्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु न केल्यास संबंधीत ठेकेदाराच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल , असा इशारा येथील माजी सरपंच प्रेम चव्हाण यांनी दिला आहे.