लाईव्ह न्यूज

Solapur Crime : औंढा नागनाथ येथील तीन ठगांवर गुन्हा दाखल; संगणकावर टोकन दर्शन पासमध्ये छेडछाड

पोलिसांनी अधिक तपास करून बनावट पास तयार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण मधुकर सातपुते, मारुती जगन्नाथ सातपुते व सचिन बालाजी राऊत (सर्व रा. औंढा नागनाथ, ता. वसमत, जि. हिंगोली) अशी या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.
Digital Darshan Scam Exposed at Aundha Nagnath; Three Accused in Police Net
Digital Darshan Scam Exposed at Aundha Nagnath; Three Accused in Police Netsakal
Updated on: 
4 लेख बाकी

पंढरपूर : संगणकावर टोकन दर्शन पासमध्ये छेडछाड करून बनावट पास तयार केल्याप्रकरणी औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील तीन ठगांवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंदिर समितीचे कर्मचारी शहाजी देवकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वसमत येथील सहा भाविकांनी बनावट टोकन दर्शन पास तयार केल्याप्रकरणी मंगळवारी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून बनावट पास तयार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण मधुकर सातपुते, मारुती जगन्नाथ सातपुते व सचिन बालाजी राऊत (सर्व रा. औंढा नागनाथ, ता. वसमत, जि. हिंगोली) अशी या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.

दर्शन रांगेचे योग्य व्यवस्थापन व्हावे व भाविकांना सुलभ व जलद गतीने दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने १५ जूनपासून ऑनलाइन टोकन दर्शन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे अवघ्या काही वेळेमध्ये भाविकांना दर्शन मिळत आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील काही भाविकांनी टोकन दर्शन पासमध्ये छेडछाड करून बनावट टोकन दर्शन पास तयार केले होते.

Digital Darshan Scam Exposed at Aundha Nagnath; Three Accused in Police Net
जुन्नर तालुका हादरला! 'जुन्नरमधील कोकण कड्यावरून उडी मारून दोघांनी संपवले जीवन'; रूपालीने मृत्यूपूर्वी लिहीली चिठ्ठी..

ही बाब मंदिर समितीच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित सहा भाविकांबरोबरच बनावट पास तयार करणाऱ्या इतर तीन जणांवर ही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील स्थानिक एजंट मात्र अजूनही मोकाट आहेत. या एजंटांचा शोध घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी , अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com