
सोलापूर: जुळे सोलापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापकाला अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी डिजिटल ॲरेस्ट केले. सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून तब्बल आठ लाख रुपयांना गंडविल्याची घटना समोर आली आहे. आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच त्या निवृत्त प्राध्यापकाने मुलाला कॉल करून हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.