
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आल्याने नागरिकांचा नाराजी वाढत असल्याने महादेवी हत्ती परत नांदणीच्या मठात आणण्यासाठी मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबने मात्र मंगळवेढा -कोर्टी -मंगळवेढा अशी ६८ किलोमीटरची सायकल राईड काढून महादेवी हत्ती परत आणाची हाक दिली.