

Two crore milking animals power Maharashtra's dairy economy, with Solapur contributing 18 lakh litres to the state’s daily production.
Sakal
-संदीप गायकवाड
उ. सोलापूर: राज्यातील जवळपास दोन कोटी दुधाळ पशू दररोज २ कोटी ९० लाख लिटर दूध उत्पादित करत आहेत. शेतीच्या या जोडव्यवसायामुळे लाखो शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत होते, तर शेतीचे आरोग्यही याच व्यवसायावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात सद्य:स्थितीला १७ ते १८ लाख लिटर दूध उत्पादित होत असून, जिल्ह्यातील कित्येक गावांचे अर्थकारण या व्यवसायाभोवती फिरत आहे.