
उ.सोलापूर : राज्य सरकारने गाईच्या दुधाला दिलेल्या अनुदानामध्ये गडबड झाली आहे. कमी गुण गुणप्रतीच्या दुधाला अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच बोगस आकडेवारीच्या आधारे अनुदान लाटण्याचाही प्रयत्न झाला आहे. यामुळे सरकारने सोलापूरसह पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध अनुदानाच्या प्रक्रियेची तपासणी सुरू केली आहे. यासाठी विशेष लेखापरीक्षकासह इतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.