

Damaji Sugar Factory Financial Situation and Farmer Demands
Sakal
मंगळवेढा : दामाजीची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने स्वतःचे उतारे गहाण ठेवून सभासदांच्या व शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे 3000 चा दर मान्य करत पहिला हप्ता 2800 रुपये खात्यावर जमा करत व उर्वरित दोनशे रुपयेचे बिल देणार असून यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही तरी सुद्धा शेतकरी संघटनेकडून दामाजी कारखाना बंद पाडल्यामुळे ऊस उत्पादक, वाहतूकदार ऊसतोड कामगाराचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.