

Daund Kalaburagi train
Sakal
सोलापूर : प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून जाणारी दौंड- कलबुर्गी या विशेष अनारक्षित गाडीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दौंड-कलबुर्गी ही विशेष गाडी आठवड्यातून ५ दिवस धावते. गाडी क्रमांक ०१४२१/ ०१४२२ दौंड- कलबुर्गी ही अनारक्षित विशेष गाडी गुरुवार आणि रविवार वगळता आठवडाभर धावते. २८ फेब्रुवारीपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे.