esakal | व्यसनमुक्तीची ती चळवळ बनलीय अनेकांचा आधार 
sakal

बोलून बातमी शोधा

AA.jpg

10 जून रोजी अमेरिकेत अल्कोहोलिक्‍स अनॉनिमस्‌ या अनोख्या संघटनेची स्थापना झाली. अतिरिक्त मद्यपान, किंवा मद्याची आसक्ती हा एक आजार आहे. हे आता सर्वमान्य होत असले तरी पूर्वी व्यसनी माणसांचे कुटुंब व समाजाकडून त्यांना तिरस्काराला सामोरे जावे लागत असे. ज्या घरात व्यसनी माणूस आहे त्या कुटुंबाला अजूनही अवहेलना-अपमान सहन करावा लागतो. पूर्वी जगभर अनेक मद्यपीडितांना वेड्यांच्या इस्पितळात किंवा जेलमध्ये पाठवले जात असे. 

व्यसनमुक्तीची ती चळवळ बनलीय अनेकांचा आधार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः एखादा पुर्वीच्या व्यसनातून बाहेर पडलेला मद्यपीच अन्य व्यक्तीला मद्याच्या त्रासातून सोडवू शकतो या आधारावर चालणारी एए ही जागतीक व्यसनमुक्ती चळवळ 86 वर्षामध्ये पर्दापण करीत आहे. 

हेही वाचाः सोलापुरच्या विडी उद्योगाचा तिढा सुटण्याच्या दिशेने 

10 जून रोजी अमेरिकेत अल्कोहोलिक्‍स अनॉनिमस्‌ या अनोख्या संघटनेची स्थापना झाली. अतिरिक्त मद्यपान, किंवा मद्याची आसक्ती हा एक आजार आहे. हे आता सर्वमान्य होत असले तरी पूर्वी व्यसनी माणसांचे कुटुंब व समाजाकडून त्यांना तिरस्काराला सामोरे जावे लागत असे. ज्या घरात व्यसनी माणूस आहे त्या कुटुंबाला अजूनही अवहेलना-अपमान सहन करावा लागतो. पूर्वी जगभर अनेक मद्यपीडितांना वेड्यांच्या इस्पितळात किंवा जेलमध्ये पाठवले जात असे. 

हेही वाचाः उन्हाळी भूईमूग काढणीस प्रारंभ 

व्यसनी मनुष्य मुद्दामच असे वागतो किंवा तो वेडा आहे अशी तेंव्हा समजूत होती. व्यसनातून आलेल्या नैराश्‍याला कंटाळून अनेकजण आत्महत्या करीत असत. मद्यपिडीतांना कुणाचा आधारच नव्हता. पण अल्कोहोलिक्‍स अनॉनिमस्‌ या संघटनेच्या रूपात मद्यपिडीतांना आधार सापडला. बिल डब्लू. व डॉ. बॉब या दोन मद्यपिडीतांनी या संघटनेची स्थापना केली. मद्यपिडीत हे एका दुर्धर आजाराचे बळी असून त्यांना त्यांच्यासारख्याच पीडितांकडून आधार मिळाल्यास ते आजारावर मात करू शकतात हि आशा ए.ए. ने दिली. आज जगभर या संघटनेच्या शाखा आहेत. या संघटनेच्या मदतीने लाखो स्त्री पुरुषांनी अगदी मोफत मद्याच्या व्यसनापासून सुटका मिळवली आहे. 
गरीब, श्रीमंत, जात, धर्म, भाषा असा कुठलाही भेद विचारात न घेता केवळ ज्यांना मद्यपानाची समस्या आहे त्यांच्या मदतीसाठी ए.ए.कार्यरत राहिली आहे. 
दारूने आपल्या जीवनात केलेली धूळधाण व यातून सुटकेसाठी काय मार्ग आहे, याची देवाणघेवाण ए. ए. च्या नियमित सभांमध्ये होत असते. त्यामुळे मद्यपीडितांना मदतीचा हात मिळणे हे काम संघटना करते. 
ए.ए. मार्फत विविध शहरात विनामूल्य हेल्प लाईन सेवा दिली जाते. टाळेबंदीच्या काळात हि हेल्पलाईन सुरु होती. आता ए. ए. च्या ऑनलाईनसभा देखील सुरु आहेत. लॉकडाउन दरम्यान मद्याच्या दुकानावर झालेली गर्दी-गोंधळ असला तरी ए.ए.च्या ऑनलाईन सभामधून व्यसनमुक्त झालेले लोक एकमेकास मदत करत होते. 
या संघटनेची मदत सर्वांना घेता यावी याकरता संघटनेचे सदस्य त्यांची कोणतीही वैयक्तिक ओळख सार्वजनिक करत नाहीत. त्यामुळे कोणताही मद्यपी सहजपणे सदस्यांची मदत घेऊ शकतो. महाराष्ट्रासाठी ही संघटना या क्रमांकाच्या आधारे व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन करते. 

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे मोठे काम

राज्यात एए मार्फत व्यसनमुक्तीसाठी सर्व  जिल्ह्यात सभा व सदस्य मद्यपींना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी  एए महाराष्ट्र राज्य सेवा समितीने मो.7499077047 व 9422675849 वर हेल्पलाईन उपलब्ध केली आहे. 

- सुधीर, एए  राज्य सेवा समिती 

सोलापूर मध्ये मद्यपींना मदत 

एएच्या माध्यमातून सोलापूर मध्ये देखील व्यसनात अडकलेल्या लोकांना मदत केली जाते. शहरात मोठया प्रमाणात ऑनलाईनसभा घेतल्या जात आहेत

- सुरेंद्र एए सदस्य सोलापूर

loading image
go to top