

The mangled two-wheeler at the spot where a container rammed into the Chikkalgi youth’s bike.
Sakal
मंगळवेढा : जत तालुक्यातील शेगाव हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कंटेनर अन् दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कामन्ना संगाप्पा हत्तळी (वय २५, मूळ रा. चिक्कलगी, ता. मंगळवेढा) व सचिन गणेश व्हनमाने (वय २१, रा. शेगाव, ता. जत) असे मृत तरुणांची नावे आहेत. भावाच्या लग्नाला जाताना दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.