

Solapur Politics: Unified NCP Strategy Finalised in Baramati Meeting
Sakal
सोलापूर : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित लढणार आहे. एकत्रित लढत असताना भाजप सोडून अन्य पक्षाला सोबत घेतले जाणार आहे. कोणत्या तालुक्यात कोणाला सोबत घ्यायचे? याचे अधिकार तालुका पातळीवर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार व माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासोबत बारामतीत झालेल्या बैठकीत झाला आहे.