
Declare Wet Drought in Sangola Constituency, MLA Deshmukh Requests CM Fadnavis"
Sakal
- दत्तात्रय खंडागळे.
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंगळवर (ता. २३) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.