डॉक्‍टरांच्या प्रश्‍न सोडवण्याची निमा संघटनेची मागणी 

nima nivedan.jpg
nima nivedan.jpg
Updated on

सोलापूर: कोरोना महामारीत काम करणाऱ्या एमबीबीएस व बीएएमस डॉक्‍टरांचा कोरोना महामारी मृत्यू झाल्यास त्यांना मदत मिळावी. विमा संरक्षण योजनेची अंमलबजावणी करावी, डॉक्‍टर व विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत एमबीबीएस व बीएएमएस डॉक्‍टरांना समान वेतन मिळावे, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले. 

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापूराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दरेकर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. 

त्यावेळी आयुष डॉक्‍टर्सच्या विविध न्याय मागण्यासंदर्भात निमा संघटनेच्यावतीने सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात विरोधी पक्षनेते दरेकर यांची भेट घेतली. त्यांना या मागण्याचे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या सहकार्याने निमा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली, निमा संघटनेच्या लिगल कमिटीचे कायदेतज्ज्ञ डॉ. धनंजय कुलकर्णी, सोलापूरचे सचिव डॉ. राहुल कुलकर्णी, खजिनदार डॉ. ऋषिकेश जोकारे, निमा सदस्य डॉ. किरण देशमुख, भाजप शहर सोलापूर चिटणीस देविदास बनसोडे, आमदार विजयकुमार देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उमेश कोळेकर, सोमनाथ मेंडके, रवी मस्के उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Heavy Flooding Hits Pandharpur, Yet Pilgrims Refuse to Miss the Holy Wari
Solapur
Solapur
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com