उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होईल, मात्र... | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होईल, मात्र...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होईल, मात्र...

उपमुख्यमंत्री म्हणाले, विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होईल, मात्र...

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचे (Covid-19) संकट अजून काही कमी झालेले नाही. चीन (China), रशिया (Russia), युरोपसह (Europe) इतर अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लस घेतली पाहिजे, तरच कोरोना संकटातून आपण सहीसलामत बाहेर पडू; अन्यथा या संकटाला पुन्हा सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करत, लवकरच विठ्ठलभक्तांना देवाचे चरणस्पर्श दर्शन सुरू केले जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पंढरपुरात (Pandharpur) पत्रकारांशी बोलताना दिले.

हेही वाचा: 'विरोधकांची दुटप्पी भूमिका ST कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!'

उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सोमवारी (ता. 15) कार्तिकी एकादशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कोरोना लसीकरणाबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची सूचनाही केली.

या वेळी अजित पवार म्हणाले, कोरोना महामारीचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे पुन्हा जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. राज्यभरातील भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने सर्व धार्मिक स्थळे खुली केली आहेत. कार्तिकी यात्रेसाठी देखील परवानगी दिली आहे. नागरिकांनीही मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्‍यक आहे. सध्या भाविकांना मुखदर्शन व्यवस्था सुरू केली आहे. पदस्पर्श दर्शन सुरू करण्याबाबत लवकरच मंदिर समितीशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही श्री. पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासाठी सांगलीच्या शिवसैनिकाची पंढरी वारी!

या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top