मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आरोग्यासाठी सांगलीच्या शिवसैनिकाची सपत्नीक पंढरीची पायी वारी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासाठी सांगलीच्या शिवसैनिकाची सपत्नीक पंढरीची पायी वारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आरोग्यासाठी सांगलीच्या शिवसैनिकाची सपत्नीक पंढरीची पायी वारी!

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासाठी सांगलीच्या शिवसैनिकाची पंढरी वारी!

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना आराम मिळावा, यासाठी सांगली (Sangli) जिल्ह्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजीवकुमार सावंत (Sanjivkumar Sawant) आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत (Rupali Sawant) यांनी 80 किलोमीटर अंतर पायी येऊन पंढरीची वारी (Kartiki Wari) पूर्ण केली आहे.

हेही वाचा: 'कार्तिकी'निमित्त आकर्षक फुलांनी-विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना निरामय आरोग्य लाभावे, असे जत तालुक्‍यातील बनाळी येथील शिवसैनिक संजीवकुमार सावंत यांनी विठ्ठलाला साकडे घातले होते. त्यानुसार संजीवकुमार सावंत यांनी तीन दिवसात अनवाणी 80 किलोमीटरचे अंतर पार करत पंढरीची वारी पूर्ण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची विठ्ठलावर अढळ श्रद्धा आहे. हीच भावना ठेवून संजीवकुमार सावंत या शिवसैनिकाने आपल्या नेत्याप्रति असलेल्या प्रेमापोटी सपत्नीक पंढरीची पायी वारी पूर्ण करून नेत्याला दीर्घायू लाभू दे, असे विठ्ठलाला साकडे घातले.

विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ आणि चंद्रभागेचे तीर्थ घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार असल्याचा मनोदयही सावंत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजीवकुमार सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी पंढरपूरची पहिली पायी वारी केली होती. त्या वेळी त्यांनी

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून चंद्रभागेचे तीर्थ दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला संजीवकुमार यांना उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निरामय आरोग्यासाठी पायी पंढरीची वारी करणाऱ्या सावंत दाम्पत्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या पायी वारीत साहेबराव पाटील, महेश यादव, रघुनाथ कोडग, मारुती कोडग, तुकाराम जाधव, गणेश सावंत, दत्तात्रय लिगाडे, राहुल पाटील आदी सहभागी झाले होते.

loading image
go to top