
सोलापूर : सुभाष देशमुखांच्या पक्ष कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबतच्या विधानाची चर्चा असताना स्व. पतंगराव कदम यांच्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दिलीप माने यांची राजकारणापलीकडची जुनी मैत्री झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पालकमंत्री गोरे गुरुवार माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. या भेटीचा राजकीय अर्थ शोधला जात आहे.