Solapur : रेल्वेने ११ कोटी देऊनही शेतकऱ्याची झोळी रिकामीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : रेल्वेने ११ कोटी देऊनही शेतकऱ्याची झोळी रिकामीच

Solapur : रेल्वेने ११ कोटी देऊनही शेतकऱ्याची झोळी रिकामीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बाळे परिसरातील कसबे सोलापूर, बसवेश्वर नगर भाग १, २, ३, तसेच पाकणी येथील १० ते १२ शेतकऱ्यांना १५ वर्षांपूर्वी संपादित केल्या होत्या. मात्र यावर रेल्वेकडून सोलापूर महसूल खात्याकडे जमिनीचे पैसे देण्यात आले आहेत. मात्र एक महिना उलटला तरीही महसूल खात्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नसल्याने शेतकऱ्यांचे खाते अद्यापही रिकामेच आहे.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

सोलापूर-मोहोळ या दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वेने २००६ साली शेतकऱ्यांची जमिनी संपादीत केल्या होती. विशेष म्हणजे त्यांना हे पैसे द्यावेत, असे आदेश रेल्वेकडून एक महिन्यापूर्वी देण्यात आले असताना देखील, तरीही महसूल विभागाच्या अजब कारभाराने या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा त्यांच्याच हक्कासाठी पैसे मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. महसूल प्रशासनाच्या अजब कारभारामुळे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम शेतकऱ्यांनी थांबवून ठेवले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका रेल्वेस सहन करावा लागत आहे. त्यामुळे जमिनीचा मोबदला शेतकऱ्याच्या खात्यावर केव्हा जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील रामहिंगणी, कोळेगाव, विरवडे, मुंडेवाडी, पोफळी, वडवळ, येथील शेतकऱ्यांना १५ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही मिळाला नाही. सोलापूर-पुणे दुहेरीकरणाच्या कामासाठी २००६ साली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या. मागील १५ वर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्‍काचे पैसे मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. एक महिन्यांपूर्वीच रेल्वेने सोलापूर महसूल खात्याकडे पैसे जमा केल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी बाळे भागातील विद्युतीकरणाचे काम थांबविले आहे. त्यामुळे यावर रेल्वे बोर्डाकडून निधी सोलापूर महसूल कार्यालयास प्राप्त होवूनही शेतकऱ्यांना मागील एक महिन्यांपासून मिळत नसल्याने आणखी किती दिवस शेतककऱ्यांना वाट पहावी लागणार आहे, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी अनेकदा आंदोलन, उपोषण, काळे झेंडे दाखवून रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्‍त केला. मात्र, त्यांच्या पदरी अद्यापही निराशाच पडली आहे. बाळे परिसरात असलेल्या कसबे सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी मोबदला म्हणून ११ कोटी ७६ लाख ९० हजार १९० रुपये आले आहेत. तर पाकणी येथील बाधीत शेतकऱ्यांसाठी १४ लाख ८९ हजार ७७७ रुपये आले असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

"मागील महिन्यात सोलापूर महसूल विभागाकडे शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेस जवळपास एक महिना होत आहे. येत्या काळात थांबलेले कामास सुरवात करण्यात होईल."

- शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर

"बाळे, पाकणी परिसरातील बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे आले असून, त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ज्या शेतकऱ्यांची जमिनी बाधीत झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे महसूल कार्यालयात जमा केल्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील."

- नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी-भूसंपादन, सोलापूर

या गावातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे

रामहिंगणी : १ कोटी २३ लाख ३० हजार ८३२ रुपये

कोळेगाव : २ कोटी ३२ लाख ९२ हजार ७६४ रुपये

विरवडे : ३४ लाख ६६ हजार ६४ रुपये

मुंडेवाडी : ८४ लाख ९८ हजार ७३५ रुपये

पोफळी : ३६ लाख ६३ हजार ७६० रुपये

वडवळ : २ कोटी ५५ लाख ७८ हजार ७९४ रुपये

loading image
go to top