esakal | पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

 satpute-pune_202010501245 (1).jpg

पोलिस अधीक्षकपदाचा झेंडे यांच्याकडे पदभार
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मला कोरोनाचे निदान झाले आहे. मागील तीन-चार दिवसांत ते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून कोरोनाची योग्य खबरदारी घ्यावी, असा मेसेज आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे. कोरोनाचे उपचार त्या घेत आहेत. तोवर पोलिस अधीक्षपदाचा पदभार अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला होता. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनाही तसाच अनुभव आला होता. आतापर्यंत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, महापौर, पोलिस उपायुक्‍तांसह काही नगरसेवकांना कोरोनावर मात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नुकतीच कोरोनावर मात करून पुन्हा ड्यूटी जॉईन केली आहे.

पोलिस अधीक्षकपदाचा झेंडे यांच्याकडे पदभार
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मला कोरोनाचे निदान झाले आहे. मागील तीन-चार दिवसांत ते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून कोरोनाची योग्य खबरदारी घ्यावी, असा मेसेज आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे. कोरोनाचे उपचार त्या घेत आहेत. तोवर पोलिस अधीक्षपदाचा पदभार अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या निमित्ताने प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सातत्याने लोकांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क येतो. वारंवार बैठकांचे आयोजन करून नागरिकांना व त्यांच्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना कराव्या लागतात. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोनदा कोरोनावर मात करीत पुन्हा काम हाती घेतले आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनीही कोरोनावर मात करून ड्यूटी जॉईन केली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील आमदार प्रशांत परिचारक, यशवंत माने, प्रणिती शिंदे यांनीदेखील कोरोनावर मात केली आहे. आता आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील यांना कोरोनाची बाधा झाली असून ते उपचार घेत आहेत. दुर्दैवी घटना म्हणजे ज्येष्ठ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, आमदारांनाही कोरोनाची बाधा होऊन ते बरे झाले आहेत.

loading image
go to top