
Lakshmi proudly holding her law degree, a testament to perseverance and courage.
Sakal
अभय दिवाणजी
मूळचे इंडी (कर्नाटक) येथील जमादार कुटुंबीय. उदरनिर्वाहासाठी सोलापुरात स्थायिक झालेले. दोन मुली, एक मुलगा अशी तीन अपत्ये. कशीबशी हाता-तोंडाशी गाठ. अप्पा हलवाईच्या दुकानात आचारी म्हणून काम करत कसातरी संसाराचा गाडा हाकला जात होता. लक्ष्मी हे दुसऱ्या नंबरचे अपत्य. अन्य दोघांना शिक्षणाची गोडी नसल्याने त्यांनी कसेबसे थोडेफार शिक्षण घेतले. पण लक्ष्मीने जामश्रीमध्ये दिवसा काम करत स्वावलंबनातून शिक्षण घेत रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.