
सोलापूर: कर्नाटकातील देवरनिंबर्गी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील ग्रामपंचायत सरपंचाची डोळ्यांत चटणी पूड टाकून व गावठी पिस्तुलातून तीन - चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी (ता. ३) सकाळी ८.५० च्या सुमारास गावातील हेअर कटिंग सलुनमध्ये ही घटना घडली. भिमनगौडा कल्लणगौडा बिरादार (वय ४०) असे सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.