
Flood-Affected Will Get Financial Aid Without Strict Criteria: Fadnavis
Sakal
माढा: निकषांवर बोट न ठेवता नागरिक केंद्रीत, शेतकरी केंद्रीत मदत करणार असून यासाठी केंद्र सरकारही सहकार्य करणार आहे. दिवाळीपूर्वीच सरकार पूरग्रस्तांना मदत करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माढा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर निमगाव (माढा) व दारफळ (सीना) येथील पूरपरिस्थितीची त्यांनी बुधवारी (ता. २४) पाहणी केली. यावेळी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.