
Devotion Beyond Limits – 3,300 km Pilgrimage to Tuljapur by a Kali Devotee
Sakal
सोलापूर : आदिशक्तीच्या भक्तीमार्गावर चालताना एका भाविकाने गेल्या चार वर्षांपासून अद्भूत प्रवास केला आहे. त्यामुळे भाविकांच्या आकर्षणाचे कारण हा भाविक ठरत आहे. हैदराबाद येथील मलिकपेठचे रहिवासी बाबूराव पेंटय्या यांची आदिशक्तीवर प्रचंड श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटीच्या त्यांनी कालिकामातेच्या वेशभूषेत हैदराबाद ते कोलकता व कोलकता ते तुळजापूर असा ३३०० किलोमीटरहून अधिक लांबीचा प्रवास करत तुळजाभवानीच्या दर्शनाची आस पूर्ण केली आहे.