
-भारत नागणे
पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीने दर्शन बारीमध्ये अनेक बदल केल्याने दर्शन रांग जलद गतीने पुढे जात आहे. परिणामी ऐरवी 18 -18 तास दर्शन रांगेत उभे राहणार्या भाविकांचे आता अवघ्या सहा ते सात तासांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन होत आहे. दर्शनाचा कालवधी निम्यावर आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वारीकाळात वशिल्याचे ( व्हीआयपी) दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दर्शनाची गती आणखी वाढली आहे.