
पंढरपूर : दर्शन रांगेतील भाविकांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. पुणे येथून दर्शनासाठी आज पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पदस्पर्श दर्शनाची रांग लांबपर्यंत गेली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना सायंकाळपर्यंत दर्शन न मिळाल्याने अनेक भाविकांनी दर्शन रांगेतच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.