Solapur Shravan Month: 'काझीकणबस येथे आढळले यादव कालीन शिवमंदिर'; श्रावण महिन्यामुळे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Yadav Period Shiva Temple Found in Kazikanbas: पांढऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आलेले मंदिर यादव काळातील असून पूर्वी तेथे भव्य शिवमंदिर होते. मंदिरावर परकीयांचे आक्रमक होऊ नये म्हणून ते मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकण्यात आले असावे.
Devotees visiting the newly discovered Yadav-era Shiva temple in Kazikanbas during the holy Shravan month.Sakal
सोलापूर : अक्कलकोटपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या काझीकणबस या गावच्या मध्यवर्ती ठिकाणी पांढऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली यादव काळातील शिवमंदिर आढळून आले आहे. श्रावण महिन्यात महादेवाचे मंदिर आढळल्याने हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.