
सोलापूर: अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात काशी पिठाचे जगद्गुरू श्री डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे जगाच्या कल्याणासाठी ४ थे तपोनुष्ठान सुर आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी श्री पंचमुखी परमेश्वर मंदिरात ‘भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्तिभाव से आया हूँ’, ‘ऐसी लागी लगन मीरा हो गयी मगन’, ‘कानडा राजा पंढरीचा’ या सारख्या गीतांनी भक्त तल्लीन झाले.