

MP Dhairyasheel Mohite-Patil addressing party workers, promising opportunities to loyal youth during pre-election meet.
Sakal
मोहोळ: मोहोळ तालुक्याची राजकीय परिस्थिती विचित्र झाली आहे, अशी चर्चा आम्ही ऐकतोय. कुणी भाजपमध्ये जातोय तर कोण आघाडी करून लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा जो संकटकाळी पवारसाहेबांच्या मागे उभा राहिला अशा तरुणांना संधी देणार आहे. आम्ही चिन्हावर निवडणुका लढवणार आहोत. आघाडी होवो अथवा न होवो. वेगळी आघाडी करून लढायचे व नंतर इकडून तिकडे उड्या मारायच्या, हे या पक्षात चालणार नाही. कुठलाही निर्णय मी एकटा घेणार नाही. त्यासाठी कोअर कमिटी स्थापन करून उमेदवारी निश्चित करण्याची जबाबदारी समितीवर असणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.