

High Court Kolhapur bench cancels FIR against PI Dhananjay Jadhav
Sakal
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावर शासकीय कर्तव्य पार पाडण्यात कसुरी केल्याचा गुन्हा घटना घडल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. कर्तव्यामध्ये आपली काहीही चूक नसताना अन्यायाची भावना निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यास उच्च न्यायालय मुंबई येथे याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे अंतिम सुनावणी होऊन गुन्हा रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.