
Shocking Assault on Female Bus Driver Over Disability Card Request in Maharashtra
बार्शी : धाराशिव-परंडा बस शहरातील परंडा रस्त्यावरून जाताना महिला बस वाहकाने प्रवाशास अपंगत्वाचे कार्ड मागितले. याचा राग आल्याने कार्ड नाही म्हणत महिलांनी शिवीगाळ करीत वाहक महिलेस मारहाण केली. बससमोर झोपून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. सहाजणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.